राजकारण-Politics |
राजकारण
राजकारण्यांची भरली महफिल खोट्या शब्दांचा पूर आला,
कुणाला निवडून द्यावं आम्ही जो तो इथे भकासुर झाला.
खुर्ची साठी खेळ सारा पैश्याचे सारेच लालची,
गोष्ट नव्हे ही आजची मित्रा गोष्ट ही सहा दशकांची.
न्याय पालिकेचा गळा दाबूनी स्वतःची सत्ता इथे चालत आहे,
हे राजकारणी आमच्या महाराष्ट्राला यूपी-बिहार बनवत आहे.
गुन्हेगारी रस्त्यावर आली शेतकरी झाला बहाल,
कृषिप्रधान हा देश आमचा पण इथे बळीराजाचेच होत आहेत हाल.
महागाई वाढली बेरोजगारी वाढली वाढले जगण्याचे सारेच दाम,
सत्ता कुणाचीही असो प्रश्न हेच असतील मग करणार तरी कोण आमचे काम.
एकमेकांवर लोटतील सारे जेव्हा स्वतःचे नाव पुढे येईल,
नागरिक आता तूच ठरव तुझ्या गरजा अन सुख तुला कोण देईल.
कुणावर ठेवावा विश्वास कुणाची द्यावी साथ,
जो तो देतो खोटे अश्वासन पोटावर देतोय लाथ.
नको आम्हा पक्ष कुणाचा नको कुणाचेच प्रशासन,
आम्हा हवे आंबेडकरांचे विचार अन शिवछत्रपतींचे शासन.
राजे तुम्ही पुन्हा या सांगा या साऱ्या जगाला,
जात मोठी की माणुसकी शिकवा आजच्या तरुणांना.
एकाने केली क्रांती तलवारीने एकाच्या लेखणीने हा देश घडविला,
पण त्यांच्या नावाचाच गैरफायदा घेऊन आजचा मनुष्य माणुसकीलाच विसरला.
राजकारण-Politics |
हल्ली राजकारण म्हटलं की असं कुणी नाही ज्यांनी ते अनुभवलं नसेल. अगदी लहान पणापासून आपल्याला नेमकं राजकारण काय हे कळू लागतं कारण कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या सोबत घडतंच ते. शाळेत/कॉलेजात असताना सर ने त्यांच्या आवडीच्या विद्यार्थाला चान्स दिला तुम्हाला वगडून की लगेच तोंडून निघतं राजकारण (poltics) करतात सर. ऑफिस मध्ये, बिझनेस मध्ये कुठे ही जेव्हा तुमच्या मेहनतीचं फळ दुसऱ्या कुणाला दिल्या जातं राजकारण अगदी जवळून अनुभवायला मिळतं.
सध्याचं समाजकारण ही काहीसं असंच झालय. खोटे अस्वासन देऊन, कुठे पैसे खाऊ घालुन, चांगले स्वप्न दाखवून जिंकण्या साठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. वोट बँक साठी धार्मिक आस्थेशी खेळल्या जातं. का निवडणूका आल्यावरच राम मंदिरच्या मुद्द्यावर बोलू वाटतं ह्यांना. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला योग्य भाव, २४तास वीज सेवा, स्विस बँकेतील भारतीयांचं काळंधन असल्या भरपूर गोष्टी जे सत्तेत असतांना करायला हव्या ते निवडणुका आल्यावरचं का सुचतात. हिंदू-मुस्लिम दंगलींना बढावा देने, जाती जातीन मध्ये क्लेश निर्माण करणे हे आहे आजचे राजकारण. पक्ष कुणाचा ही असो सत्तेतल्या खुर्चीवर बसणाऱ्या सर्वांचे तोंडं सारखीच. आधी शिवजयंती असो वा भीमजयंती त्यांना स्वरूप उत्सवाच असायचं, जात धर्म सोडून फक्त मराठी एवढाच आपला बाणा असायचा. आता महापुरुषांची जयंती थाटात साजरी होते एकदम धुमधडाक्यात पण ती फक्त एक मेकांना हिंनवायला, कोणाचा जल्लोष वरचढ होता हे दाखवायला. ज्यांची ही जयंती आपण साजरी करतो एक वेळा कृपया त्यांचा इतिहास त्यांचे कामं वाचून बघावे, ही शिकवण त्यांची नाही ज्याला आपण बळी पळतोय.
शेतकरी आत्महत्या- payal_paikrao's_sketch_art |
अश्या वेळी मला बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे शब्द आठवतात, ते म्हणायचे " माझ्या विचारांचा हा रथ तुम्हाला पुढे घेऊन जाता आला तरंच घेऊन जा.. नाहीतर तो जिथे आहे तिथेच राहू द्या पण त्याला मागे नका आणू ".
" वरील पोस्ट आणि फोटो हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या विटंबनेच्या हेतूने बनविलेले नाहीत. एक सर्वसामान्य नागरिक आजच्या राजकारण मध्ये कसा फजितीपावतो हे विचारानं मधून आपल्या समोर येणे एवढाच हेतू आहे. कुणी याचा चुकीचा अर्थ घेऊ नये किंवा यात साम्य शोधू नये ".
-© केतन रमेश झनके