छत्रपती शिवाजी महाराज

   
raje-shiv-chhatrapati,swarajya,maratha-king,jaanta-raja,shivaji,royal-king,maharashtra,marathwada,marathi-raja,gaminikava,shatriyakulavantas,shudraking,raigadfort,janjirafort,sambhaji-maharaj
       

  छत्रपती शिवाजी महाराज


दूर करण्या काळोख स्वराज्यावरचा एक प्रकाश चमकला,
जिजामातेच्या पोटी स्वतः सूर्य जन्मला.
तेजस्वी चेहरा फौलादी छाती मर्दानी त्याची चाल,
कुत्र्यावाणी पळविले मुगलांना तो रयतेचा राजा महान.


कोवळ्या वयात तलवार हाती,
बुद्धीच्या धारेने त्याच्या आसमंत कापी.
गरजला जेव्हा तो करुनी गनिमीकावा,
रक्ताने भिजली मुगलांची माती.


पाहिला का कुणी राजा असा मंदिराच्या भिंतीला मस्जिद बांधणारा,
पहिला का कुणी माणूस असा तरुणीला देखील आईची उपमा देणारा.
नसतो असा मनुष्य तो देवच असतो,
त्याला गरज नाही देवळात बसण्याची तो आमच्या हृदयात असतो.


स्थापून स्वराज्य बहुजणांचं राजा आमचा बसला सिंहासनी,
इतिहास ही ज्याची कृतज्ञता राखतो असा तो पारसमनी.
त्यांच्या शिकवणीतले वारसदार आम्ही आमच्या गर्वाची ही बाब आहे,
या मातीला लाभले राजे आमचे हे आमचे सौभाग्य बेहिसाब आहे.

https://ketanzanke.blogspot.com/2019/02/chatrapati-shivaji-maharaj-swarajya-swarajya-rakshak-maratha-shatriyakulvantas-shivjayanti-2019.html
छत्रपती शिवाजी महाराज

             महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वोत्तम शासनकर्ता, सर्वधर्माचा आदर करणारा समाजप्रेमी,  बुद्धी आणि नीतीच्या बळावर गढ/किल्ले जिंकणारा वीर योद्धा, प्रजेला आणि विशेषत स्त्रियांना सुरक्षित राज्य देणारा जाणताराजा म्हणजेच श्री.छत्रपती शिवाजी महाराज.
       तसं तर अगदी बाराखडी शिकायला लागलो तेव्हा पासून शिवाजी महाराज हे नाव ऐकत आलोय. पण ती गोस्ट ज्या मूळे मला त्यांच्या बद्दल वाचण्याची ओढ लागली ती म्हणजे मधुकर जोशी यांनी लिहलेली कविता. शाळेत कुठल्यातरी वर्गात असतांना ही कविता अभ्यासक्रमात होती जी वाचून शिवाजी महाराज हे नाव मनावर कोरल्या गेलं.
Shivaji maharaj,Chhatrapati shivaji maharaj,छत्रपती शिवाजी महाराज,स्वराज्य रक्षक,Bhima koregaon,Shiv jayanti
Shiv jayanti

" अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती "

१६६७ साली कल्याण वर धाड टाकून लुटेचा माल मराठा सरदार आबाजी सोनदेव ह्यांनी शिवबांच्या दरबारी आणला. त्या वेळी मुगलांनी एक प्रथा लावलेली होती, फक्त सोने आणि दागिनेच नाही तर स्त्रियांना सुद्धा बळजबरीने आणलं जायचं. त्या स्त्रियांना दासी बनवल्या जायचं, त्यांचा बलात्कार केला जायचा आणि सर्वात सुंदर असलेल्या स्त्रीला राजाच्या हवाली केलं जायचं.
बिजापूर चे सुभेदार मुल्ला अहमद यांची ती तरुण आणि अतिशय देखणी सून हिला आबाजी सोनदेव ह्यांनी लूट मध्ये आणले. लुटेची भेट म्हणून आबाजींनी तिला महाराजांन समोर पेश केले. तिचे सौंदर्य बघून राजे तिला म्हणाले," माझी आई पण तुमच्या इतकी सुंदर असती तर मी सुद्धा सुंदर झालो असतो ". हीच ती जिजामातेची शिकवण परस्त्री ला सम्मान देण्याची, तिला मातेची उपमा देण्याची. राजेंनी तिची माफी मागितली आणि तिला सुखरूप सासरी पोचवण्याचा आदेश दिला. आणि पुन्हा लूट मध्ये कुठल्या ही स्त्रीला आणू नये आणि निरादर ही करू नये हा नियम लावण्यात आला.
       मनाला लागणारी ती गोस्ट होती. माझा कवितेतला रस आणि लिहण्याची आवड निर्माण होण्यामागच्या कारणांन मधलं हे एक विशेष कारण.
                       
                                      -  © केतन रमेश झनके


4 comments


EmoticonEmoticon

Dear Comrade

            वंदन तुम्हा कराया शब्द हे पुरे नाही, कार्य हे तव जणांचे सोपी ही बात नाही. अवघड परिस्तिथीत ही कर्तव्य बाळगे जो, तुमच्यात ...