माऊली
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,
स्वतः सोसुनी दुःखं सारे संकटांना तीच तारी.
आईच्या प्रेमाला जगात कुठेच स्वार्थ नाही,
कितीही फेडा ऋण तिचे तिच्या उपकारांना अंत नाही.
फाटक्या पदराचे थिगड तिचे अन श्रमाचे सुरकुत्या बोली,
दारिद्र्य दूर करणार बाळ माझं अपेक्षा तिची वाचा खोली.
तुझ्या शिक्षणासाठी ती पसरवायची आज जगण्यासाठी पसरवत आहे झोळी,
तुझ्या ब्रँडेड बुटा खाली चिरडलेली तिची अपेक्षा कधीच होती रे मेली.
तू राहतो महालात ती रस्त्यावर लोळत आहे लाज वाटू दे रे थोडी,
तुला देण्या आयुष्य सुखाचे तिच्या अस्तित्वाचीच केली तिने होळी.
कसे मिळणार सुख तुला तुझे मुले ही कधी मोठी होणार,
जीवनाचे महत्व तुला तेव्हाच कळणार जेव्हा ते ही तुला असेच लाथाडणार.
नव्हती मागत ती वैभव जगाचे तुझ्या हृदयात थोडासा निवारा मागत होती,
तुला लहानाचे मोठे केलेल्या हातासाठी फक्त थोडासा सहारा मागत होती.
हरवलेल्या पोटच्या गोळ्याची ती फक्त वाट बघत होती,
तुला मिळावे सुख सारे देवाला इतकेच ती मागत होती.
किती म्हणावं निस्वार्थ त्या प्रेमाला किती दुःख ती शोषत होती,
अखेरच्या स्वासापर्यंत तरीपण ती नाव तुझेच जपत होती.
माऊली |
-© केतन रमेश झनके
म्हणतात ना तुम्हाला तुमच्या आई पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने कुणीच नाही ओळखू शकत, का ??... कारण ९ महिन्यांचा सहवास जास्त असतो ना तिचा तुमच्या सोबत इतरांच्या तुलनेत. ती नाळ अगदी जन्माच्या आधी पासून जोळलेली असते आणि जेव्हा जन्म घेतो तेव्हा ती तुटते पण तिच्या हृदयात मात्र ती तशीच असते कायमस्वरूपी.
स्त्रीची सहनशक्ती आणि साहस यास कोणताच पुरुष साम्य नाही करू शकत. तुमच्या शरीरातलं कुठलंही लहान हाड तुटलं तर किती त्रास होईल ?? आपलं एक हाड तुटलं तर सहन न होणारी वेदना आपण अनुभवतो, पण विचार केलाय का प्रसूती दरम्यान स्त्रीला होणारी वेदना ती कशी सहन करत असेल. २० हाडं एक सोबत जेव्हा तुटतात तो होणार त्रास असतो प्रसूती दरम्यान एका स्त्रीला. अशी शक्ती आणि असे साहस सामान्य माणूस नाहीच करू शकत, म्हणून तर म्हणतात ना स्त्री ही देवीचं रूप, मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली, मुलगी शिकली म्हणजेच पूर्ण घर शिकलं. ती घर सांभाळते, नवऱ्याला सांभाळते, परिवाराला सांभाळते तिचे लेकरं सांभाळते मानसिक आणि शारीरिक त्रास किती होत असेल तिला ?? आणि एवढे सगळं करून देखील स्वतःसाठी अपेक्षा काय तिची.. काहीच नाही.
मायमाऊली |
नर्मदाबाई केशवराव पाटील... मी तिला आजी म्हणायचो. मी पाचवीत असतांना बाबांची ट्रान्सफर झाली होती मलकापूरला, घरा शेजारी आमच्या तिचं कुटुंब राहायचं. नवरा फॅक्टरीत कामाला जायचा, ४ मुलं होती तिला शिक्षणात सर्वेच हुशार. मोठा मुलगा अरुण इंजिनीरिंगला होता, त्याच्या शिक्षणासाठी खूप कर्ज घेतलेले असल्या मुळे नर्मदाआजी पण शेतमजुरी करायची . सकाळी उठून सर्वांचा स्वयंपाक, कपळे, भांडे बाकी घर कामे करून ती कामाला जात असे आणि घरी आल्यावर संध्याकाळी पुन्हा घर कामे आणि स्वयंपाक. तिला कधी इतर बायकांन सारखं सणासुदीच्या दिवशी नटूनथटून जाताना नाही पाहिले मी कधीच, ना तर ती कधी घरी बसत असे. शेतात काम नसले तर ती दुसरे कुठले ही काम करत असे पण सुट्टी हा दिवस तिच्या आयुष्यात कधीच नसे. ती म्हणे आम्ही गरिबीत वाढलो शिकू नाही शकलो, मुलांना शिकवते त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नाही हाऊ देणार. एक वेळा ते त्यांच्या पायावर उभे राहिले की मग करते आराम. मला सारखं वाटायचं जेव्हा सगळे मुलं मोठे होतील कामाला लागतील तेव्हा आनंद चेहऱ्यावरचा बघण्या सारखा असेल या माऊलीचा.
Mother-माऊली |
3 वर्षे शेजारी होतो आम्ही नंतर पुन्हा वडिलांच्या ट्रान्सफर मुळे आम्ही नाशिक ला आलो. एक वरश्यानी नवरा अपघातात वारला तिचा आणि सारी घराची जवाबदारी आता नर्मदाआजी वर आली. मोठा मुलगा इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता, दुसरा मुलगा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला, तिसरा बारावीला आणि लहान मॅट्रिक ला. सर्वांचे महत्वाचे वर्ष आणि भलेमोठे कर्ज. मिळेल ते काम करून स्वतःचे शिक्षण मुलांनी पूर्ण केले. २० वर्षे ओलांडली त्या सगळ्या गोष्टी आणि नर्मदाआजी माझ्या बालपनाची आठवण बनून राहिल्या. खूप वरश्या नंतर मलकापूरला जाण्याचा योग आला, शाळेत सोबत असलेल्या एका मित्राचं लग्न होता. आता नर्मदाआजी ला जाऊन भेटतो आणि ओळखते का बघतो असे आईला सांगून मी तिच्या घरी गेलो. मातीच्या त्या घराचं आता खूप मोठया आणि भव्य बंगल्यात रूपांतर झालेलं पाहून खूप छान वाटलं, कधी मी घरात जाऊन भेटतो आजीला अशी मनात तगमग होऊ लागली. आत जाऊन बघतो तर तिथे एक दुसरे कुटुंब होते. विचारपूस केल्या वर माहीत झाले की ती जागा ५ वरश्या आधीच विकली. नर्मदाआजी च्या चार मुलांपैकी दोघे परदेशात असतात, एक मुंबई ला आणि लहान मुलगा स्वतःचा व्यवसाय करतो बंगलोर मध्ये.
मी विचारले, " आणि आजी कोणत्या मुलाजवळ असते". माझी उत्सुकता गगनाला होती, मी मनातच विचार करत होतो. " अरुण काका जवळ असेल, नाही धाकट्या जवळ असेल ". पण उत्तर ऐकून माझे कान स्तब्ध झाले, ते गृहस्थ म्हणाले अनाथ आश्रमात. मी पुन्हा विचारले प्रत्येकाची मला आठवत असलेली ओळख देऊन परत परत शहानिशा केली पण उत्तर तेच आले. मी काही विलंब न करता लगेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले अनाथाश्रम गाठले. तिथे चौकशी केली कुणी सांगेना, मी म्हटले मी तिला न्यायला आलोय मला तिच्याशी बोलू द्या. माझी तिला भेटण्याची तगमग आणि अपुलकी बघून ५-६ म्हाताऱ्या तिथे आल्या आणि मला म्हणाल्या, " ती २ वरश्या आधीच मरण पावली ". ४ मुलं असतांना देखील कुणी तिचा सांभाळ करत नव्हते. रस्त्यावर पळलेली होती भुखेने शरीराचे फक्त हाडं राहिले होते, कर्मचाऱ्यांनी तिला अनाथाश्रमात आणले. ती शेवटच्या स्वासा पर्यंत वाट बघत राहिली पण अनेक फोन करून, पत्रे लिहून सुद्धा तिला भेटायला कोणताच मुलगा नाही आला. माझे अश्रू थांबता थांबेना, मला वाटलेली कल्पनिकता आणि असलेली वास्तविकता यांचा कुठेच मेळ नव्हता.
Duck with dove |
मुलांचे लग्न झाले जो तो आपली आपली वाट घेऊन निघून गेला. धाकटा मुलगा राहते घर विकून व्यवसाय करण्यासाठी बंगलोर ला गेला आणि परत कधी आलाच नाही. कामात व्यस्त आहे नाही येऊ शकत सांगत त्याने आपला पाय काढून घेतला. दोघे परदेशी स्थायी झाले आणि ते सुद्धा परत आले नाही. अरुण एकमेव आधारस्तंभ होता त्यानेही बायको आणि आईच्या होणाऱ्या वादामध्ये आईलाच दोषी ठरवत, " मी तुला रूम करून देतो तू तिकडे राहा मी अधून मधून येत जाईल " असे सांगून वाऱ्यावर सोळले. ज्यांच्यासाठी जीवाचे रान केले त्यांनीच त्या रानाला पेटविले.
तिला होणाऱ्या त्रासाचा आणि तिच्या त्यागाच्या मोबदल्यात मिळालेल्या दुःखाचा विचार ही केल्या जाऊ शकत नाही. बस एवढेच सांगू शकतो, केलेले पाप इथेच फेडावे लागतात. कुणाला दुखावून आपण पुढे तर जाऊ शकतो पण सुखी नाही राहू शकत. आपल्या पाऊलखुणा एक दिवस आपल्याच बरबादीच कारण बनतात.
7 comments
speechless
Thanks buddy 😊
Bahot hard Bahot hard
Bhari..👌👌👌
धन्यवाद 😊
Mauli bharich👌👌✍☺
धन्यवाद माऊली 😊
EmoticonEmoticon