वंदन तुम्हा कराया शब्द हे पुरे नाही,
कार्य हे तव जणांचे सोपी ही बात नाही.
अवघड परिस्तिथीत ही कर्तव्य बाळगे जो,
तुमच्यात देव दिसतो तो देवळात नाही.
माणूस तो दूर झाला स्पर्श गुन्हेगार झाला,
तांडव करण्या पृथ्वीवर्ती कोरोनाचा उगम झाला.
हतबल मनुष्य आमुचा घरात कैद झाला,
लढण्या युद्ध कोरोनाशी सारा महाराष्ट्र उभा झाला.
बलिदान तो सुखाचा परिवार लेकरांचा, करतोय रातदिन म्हणून आपणा दिसे दिवस उद्याचा.
पोलीस असो वा डॉक्टर अन सफाई कर्मचारी,
सहकार्य त्यांना करणे आपली ही जिम्मेदारी.
कर्तव्य आपले चला आपण ही बाळगू या,
थोडीसी मदत धनाची CMला पाठवू या.
घरात राहुनी आपण सहकार्य हे करूया,
कोरोनाचा नायनाट सोबत मिळून आपणच करूया.
शुर वीरांची गड्या आपली आहे ही मातृभुमी,
Quarantine कर स्व:ताला शिवाजी राजेवानी,
कोरोना रूपी अफजल खानला चल हरवू मावळ्या रे,
घेऊन सोबतीला जीवा महाले आपल्या comrade च्या रूपानी.
- ©केतन रमेश झनके
EmoticonEmoticon