नवरात्र

           
navratri,durga,durgadevi,maa-adi-shakti,parvati,ganga,dassehra,narishakti,navratrimahotsav,navratriutsav,ghatastapna,navmi,astami

                 नवरात्र 

सृष्टीची या जननी तू भक्तांची तू आई,
मंडळ उभारून ९ दिवसांचे गुणगान तुझे जग गाई.
दुखहरणी तू सुखदाता तू भक्तीचे लोभ तुला गं नाही,
गोंधळ मांडुनी गुलाल उधडीतो गोंधळाला ये आई.

सिंहावर बैसुनी मंडळाच्या आली तू दारी,
डरकाडी घेई गगणाशी तुझी स्वारी.
नावाचा तुझ्या दिवस-रात्र नभात आवाज गुंजतो,
९ दिवस भक्तीचा तुझ्या जल्लोश आम्हा येतो.

तुझ्या या जगात हा अनर्थ का वाढला,
महिलांवर अत्याचार आणि बलात्कारास का जोर आला.
तू सुद्धा एक स्त्री आहे मग तुला राग का येत नाही,
नराधमाना मारण्यासाठी तू आता अवतार का घेत नाही.

किती ऐकावी खैरलांजी, निर्भया आणि कोपरडीची किंकारी,
कधी तर शस्त्राने तुझ्या विनाश त्यांचा कर.
पुन्हा एकदा घडू दे वध आजच्या दैत्यांचा,
दे स्त्री शक्तीचा जगास तू जागर.

नको देऊ स्त्रियांना असले जीवित मरण,
कधी सती, कधी बालविवाह किती करावे त्यांनी सहन.
युग बदलो की बदलो कितीही पिढ्या अत्याचार तसेच राहतात,
पोटातच तुला मारणारे ९ दिवस का तरी तुलाच पूजतात.

                                         - ©केतन रमेश झनके

navratra,navmi,astami,dashami,dassehra,ghatastapna,ghatnandra,parvati,durga,durgadevi,astabhujadevi,lakshmimata,jogeshwari,yogeshwari,saptasrungi,santoshimaa,renuka
Jogeshwari devi

           भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा होणारा हा उत्सव. प्रत्येक राज्यात विव्हीद परंपरेने ओळखला जातो. भारतातच नाही तर नेपाळ आणि इतर देश जिथेही हिंदूंची संख्या जास्त आहे अश्या अनेक देशांमध्ये नवरात्र उत्सव साजरा होतो.नवरात्री ही आधी कृषीविषयक कारणांमुळे ओळखल्या जायची. पहिल्या पेरणीनंतर शेतकरी घट बसवायचा आणि दहाव्या दिवशी त्याचे रूपांतर रोपट्यामध्ये व्हायचे असा नवरात्रीचा अर्थ होता. नंतर त्याला धार्मिक वळण आले आणि दुर्गादेवी चा महिषासुरवर झालेला विजय हा धर्माचा अधर्मावर झालेला विजय असे त्याचे कारण नवरात्र उत्सवास मिळाले.
         ९ दिवस दुर्गाचे ९ रूपं पुजले जातात आणि ९ रंग त्या ९ दिवसांचे महत्व सांगतात.
१) शैलापुत्री - लाल रंग - निसर्ग आणि पवित्र
२) ब्राह्मचरिणी - निळा - मोक्ष
३) चांद्रघंटा - पिवळा - सौंदर्य आणि शौर्य
४) कुसमुंडा - हिरवा - हिरवड पालवी आणि हास्य
५) स्कंदमाता - राखाडी - धाडसी आई
६) केत्यायनी - केशरी - शूर आणि धैर्यवान
७) कालरात्री - पांढरा - अधर्मावर मात
८) महागौरी - गुलाबी - बुद्धीमत्ता आणि शांती
९) सिद्धीदात्री - आकाशी निळा - सुख, आशीर्वाद आणि सकारात्मकता

         पण आजच्या दानवांच काय ??
बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस इतके वाढत चालले आहे की एकेकाळी आपल्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेला हा देश, आज महिलांवर अत्याचार आणि बालात्कारांसाठी जास्त प्रसिद्ध होत आहे. २ वरश्याच्या मुली पासून ते ८० वरश्याच्या वृद्ध महिले पर्यंत बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस ऐकायला मिळतात.
याला जवाबदार कोण आहे ?? मुलांना शिस्त आणि संस्कार न देऊ शकलेले पालक की भारतीय न्यायव्यवस्था ??
स्त्रियांना दुय्यम व्यवहार आणि गुलामीत ठेवणारी रूढी अन परंपरा की बेलगाम झालेली आजची पिढी ??
     

ब्रेकअप


breakup,lost,failed,soulmatelost,sad,alone,lonely,memory,togetherness,love,girlfriend,boyfriend,bae,stop

     

               " ब्रेकअप "

कशी सांगू माझ्या मनाची ही व्यथा,
तिच्या अन माझ्या तुटलेल्या प्रेमाची ही कथा.
जीव जुळतो जिच्याशी आयुष्य जगण्यासाठी,
किती होते व्याकुड मन तिच्या एका हाके साठी.


मी होतो ढिगार मातीचा ती होती माझा कुंभार,
पाणी पडले होते कमी अन चुकला होता थोडा आकार.
का होत होते हे होता येत फक्त विचार,
नात्यांच्या गणिताला आमच्या जसा लागला होता भागाकार.


चूक तिची ना माझी होती दोष लागलेल्या सवयीचा होता,
बोलणारे ओठ अन ऐकणार्या कानाच्या वाढलेल्या दुराव्याचा होता.
अंतर कमी होईना सवय दूर जाईना,
दुखवेल कुणी म्हणून भांडनाचा पुढाकार कुणी घेईना.


झाले भांडण झाले समझवने मित्रही सारे बोलून मोकळे झाले,
ठरवलेली मुदत अन स्वतःला बदलण्याचे सारे प्रयत्न ही बेहाल झाले.
नाही शक्य दोघांना मग ब्रेकअप हाच तर सोपा उपाय आहे,
निदान लग्न करून घटस्पोट घेण्यापेक्षा ब्रेकअप हा तर योग्यच पर्याय आहे.


म्हणून खचून न जाता आयुष्यात पुढे वाढा,
मनाने परवानगी दिली तर दुसरी कडे शिफारस लावा.
प्रेम होऊ शकतं पुन्हा, जन्म पुन्हा मिळत नाही,
नसेल नशिबी तिच व्यक्ती तर वाट पाहण्यातही काहीच अर्थ नाही.
                                          - ©केतन रमेश झनके
     
breakup,hurt,heartbroken,lostlove,firstlove,prem,pyar,loveyou,missyou,patchup,split,somebodyloveyou
Breakup       


१० मधून ६ लोकं तरी आज असे मिळतील वाचकांमध्ये ज्यांचं आयुष्य माझ्या या कवितेमध्ये कुठेतरी साम्य शोधते. फक्त ब्रेकअपचे कारण वेगळे वेगळे असू शकतात. कुणाचं संशयी वृत्ती मुळे, कुणाचं घरच्यांनी होकार नाही दिल्या मुळे, कुणाला प्रेमातच धोका मिळाल्या मुळे तर कुणाला आजकाल जास्त प्रचलित असलेल्या लॉंग डिस्टन्स रेलशनशीप मुळे. कारण काहीही असो होणारा त्रास आणि घडलेला तो निर्याय कुठेतरी आपल्याच करतूतीचे परिणाम असतात. म्हणून तर म्हणतात ना जो होता है अच्छे के लिए ही होता है.

           कुणावर जीवापाड प्रेम केलं असेल तर नक्कीच जीवन अस्थ्यवस्त होतं ब्रेकअप झाल्यावर. रोजची ती सवय, तो लाभणारा सहवास कुठेतरी नसल्यामुळे आयुष्य अस्थिर होणे अगदी सहाजिक आहे. पण या पेक्षा अजून योग्य काय असेल की ज्या व्यक्ती सोबत तुम्ही सात जन्माची स्वप्ने रंगवून बसतात तो व्यक्ती नेमका त्या स्वप्नांसाठी बनलेला नसेल तर ?? घडलेल्या साऱ्या प्रकारात आपण नशिबाला, एकमेकांना, घरच्यांना, देवाला दोष देतो आणि आपल्या मनाप्रमाणे त्याचे कारणे शोधतो. पण टाळी एका हाताने वाजत नाही ते खरंच, आपण कुठेतरी कमी पडलो situation सांभाळण्यात हे आपण लक्षातच नाही घेत. जेव्हा चूकच आपली आहे मग खचून जाण्यात काय अर्थ ?? या उलट विचार केला तर एक अनुभव आला, आपण कुठे कमी होतो किंवा काय केले असते तर ब्रेकअप नसते झाले याची जाणीव झाली. म्हणून म्हणतात ना प्रेमात पडू नका, तर खंबीर उभे रहा.
alone,breakup,lost,love,girlfriend,boyfriend,failed,seperated,sad,guilt,hardtime,memories,shatterworld,missyou,loveyouforever
Alone_but_happy


Dear Comrade

            वंदन तुम्हा कराया शब्द हे पुरे नाही, कार्य हे तव जणांचे सोपी ही बात नाही. अवघड परिस्तिथीत ही कर्तव्य बाळगे जो, तुमच्यात ...