नवरात्र
सृष्टीची या जननी तू भक्तांची तू आई,मंडळ उभारून ९ दिवसांचे गुणगान तुझे जग गाई.
दुखहरणी तू सुखदाता तू भक्तीचे लोभ तुला गं नाही,
गोंधळ मांडुनी गुलाल उधडीतो गोंधळाला ये आई.
सिंहावर बैसुनी मंडळाच्या आली तू दारी,
डरकाडी घेई गगणाशी तुझी स्वारी.
नावाचा तुझ्या दिवस-रात्र नभात आवाज गुंजतो,
९ दिवस भक्तीचा तुझ्या जल्लोश आम्हा येतो.
तुझ्या या जगात हा अनर्थ का वाढला,
महिलांवर अत्याचार आणि बलात्कारास का जोर आला.
तू सुद्धा एक स्त्री आहे मग तुला राग का येत नाही,
नराधमाना मारण्यासाठी तू आता अवतार का घेत नाही.
किती ऐकावी खैरलांजी, निर्भया आणि कोपरडीची किंकारी,
कधी तर शस्त्राने तुझ्या विनाश त्यांचा कर.
पुन्हा एकदा घडू दे वध आजच्या दैत्यांचा,
दे स्त्री शक्तीचा जगास तू जागर.
नको देऊ स्त्रियांना असले जीवित मरण,
कधी सती, कधी बालविवाह किती करावे त्यांनी सहन.
युग बदलो की बदलो कितीही पिढ्या अत्याचार तसेच राहतात,
पोटातच तुला मारणारे ९ दिवस का तरी तुलाच पूजतात.
- ©केतन रमेश झनके
Jogeshwari devi |
भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा होणारा हा उत्सव. प्रत्येक राज्यात विव्हीद परंपरेने ओळखला जातो. भारतातच नाही तर नेपाळ आणि इतर देश जिथेही हिंदूंची संख्या जास्त आहे अश्या अनेक देशांमध्ये नवरात्र उत्सव साजरा होतो.नवरात्री ही आधी कृषीविषयक कारणांमुळे ओळखल्या जायची. पहिल्या पेरणीनंतर शेतकरी घट बसवायचा आणि दहाव्या दिवशी त्याचे रूपांतर रोपट्यामध्ये व्हायचे असा नवरात्रीचा अर्थ होता. नंतर त्याला धार्मिक वळण आले आणि दुर्गादेवी चा महिषासुरवर झालेला विजय हा धर्माचा अधर्मावर झालेला विजय असे त्याचे कारण नवरात्र उत्सवास मिळाले.
९ दिवस दुर्गाचे ९ रूपं पुजले जातात आणि ९ रंग त्या ९ दिवसांचे महत्व सांगतात.
१) शैलापुत्री - लाल रंग - निसर्ग आणि पवित्र
२) ब्राह्मचरिणी - निळा - मोक्ष
३) चांद्रघंटा - पिवळा - सौंदर्य आणि शौर्य
४) कुसमुंडा - हिरवा - हिरवड पालवी आणि हास्य
५) स्कंदमाता - राखाडी - धाडसी आई
६) केत्यायनी - केशरी - शूर आणि धैर्यवान
७) कालरात्री - पांढरा - अधर्मावर मात
८) महागौरी - गुलाबी - बुद्धीमत्ता आणि शांती
९) सिद्धीदात्री - आकाशी निळा - सुख, आशीर्वाद आणि सकारात्मकता
पण आजच्या दानवांच काय ??
बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस इतके वाढत चालले आहे की एकेकाळी आपल्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेला हा देश, आज महिलांवर अत्याचार आणि बालात्कारांसाठी जास्त प्रसिद्ध होत आहे. २ वरश्याच्या मुली पासून ते ८० वरश्याच्या वृद्ध महिले पर्यंत बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस ऐकायला मिळतात.
याला जवाबदार कोण आहे ?? मुलांना शिस्त आणि संस्कार न देऊ शकलेले पालक की भारतीय न्यायव्यवस्था ??
स्त्रियांना दुय्यम व्यवहार आणि गुलामीत ठेवणारी रूढी अन परंपरा की बेलगाम झालेली आजची पिढी ??
EmoticonEmoticon