" अपयश "
जेव्हा घरटे बांधाया पंख पसरून गेलो,काडी कचरा अन धागा जेव्हा वेचायला गेलो.
वारा पावसातून जीव वाचवाया गेलो,
वीज पडली कुठून जागा शोधायाला गेलो.
घर मातीचे असो वा असो चार भिंती,
हाथ दानाचे नसले तर कसली श्रीमंती.
स्वतः राहून उपाशी गाव वाढायाला गेलो,
वीज पडली कुठून जागा शोधायाला
गेलो.
नशिबावर बोट आले,
अश्रू दोड्यातुन आले.
सारे खापर फुटाया देवाचे नाव आले, वीज पडली कुठून जागेचे शोध सुरू झाले,
पण माझ्याच का घरावर असे प्रश्न उभे झाले.
एक प्रकाश निघाला धीमा आवाज ही आला,
जे घडले सारे काही त्यावर बोलू तो लागला.
" जिथे उन पडले होते तिथे पाऊस ही आहे, हार के बाद ही जीत हे तर जगाचीच रीत आहे ".
ऐकून तोचि वाणी मन रडाया लागले,
पुन्हा प्रयत्न करायचे मग आले कितीही अडथळे,
त्या प्रकाशाला नाव देव असे मग मिळाले.
ते तर होते स्वतःचेच अंतकर्ण पण ते लपून राहिले.
- ©केतन रमेश झनके
- म्हणतात ना " वक्तसे पहले और किस्मत से ज्यादा किसींको कुछ नही मिलता".
असंच असतं आपल्या आयुष्याचं सुद्धा, अचूक वेळी अचूक संधी टिपणार्यालाच यश मिळतं. जीवनाचे उन्हाळे-पावसाळे हे प्रत्येकाच्याच नशिबी असतात फक्त त्याचा काळ वेगळा वेगळा, पण असतात जरूर. त्या क्षणी कुणी असेल धीर देणारं तुमचं प्रेम, आई-वडील, मित्रंपरिवार किंवा शुभचिंतक तर मदत मिळते थोडी पण नसेल तर हा प्रवास आणखीच त्रास देणारा ठरतो.
मी तर कधी कुणाचे वाईट नाही केले मग माझ्याच सोबत का असं घडतं ? देव माझ्यावरच का इतका दुर्लक्ष करतो ? हे येणारे प्रश्न आणि घडणारा त्रास प्रत्येकालाच येतो. जगात सुखी तरी कोण आहे ?? निट विचार केला तर आपले दुःख आणि अपयश हे इतरांच्या तुलनेत काहीच नाही. आपल्याला २ वेळेची भाकर आणि वस्त्र-निवारा तरी मिळते, रस्त्यावर भीक मागणार्याचं काय असेल बरं आयुष्य ?? डोक्यावर छत्र नाही, मोकाट जनावरासारखी ती अवस्था. खायला मिळेल की नाही हे ठाऊक नाही पण रिकाम्या पोटी तसेच जगावे लागते. एक वेळा स्वतःला त्यांच्या जागी ठेऊन बघा, स्वतःचं आयुष्य खूपच सुख-सोयीचं आहे असं जाणवेल.
Failure |
तुमच्या चुका तुम्हाला शोधायच्या असतील तर सर्वात सोपा उपाय म्हणजे काही वेळ एकटे घालवा. स्वतः बद्दल व्यक्ती तेव्हाच नीट विचार करतो जेव्हा तो पूर्णपणे एकटा असतो. कुणाची कुजबुज नाही कुणाशीच हितगुज नाही मग बघा कसं स्वतःचंच मन आपल्याशी बोलू लागतं. आपल्याच चुका आपल्याला दिसू लागतात आणि मार्गही आपण स्वतःच शोधतो, त्यालाच इच्छाशक्ती/विचारशक्ती असे म्हणतात. आपली विचारशक्ती इतकी दांडगी असते की ठरवलेली अदृश्य गोस्ट सुद्धा अस्तित्वात आणायला ती भाग पाडते. फक्त गरज असते स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि प्रयत्नांना प्रामाणिकपणे पार करण्याची. सगळे अडथळे आपोआप मग दूर होतात आणि जसा काही चमत्कारच झाला असावा असं आयुष्य बदलू लागतं. आपण त्या चमत्काराला देव म्हणत असलो तरी वैज्ञानिक त्याला इच्छाशक्ती असेच म्हणतात.
सांगण्याचे कारण एवढेच की त्याला देवाचा चमत्कार म्हणा की तुमची इच्छाशक्ती. तुमचं अंतःकर्ण तुम्हाला कुठल्याही परिस्तिथीला सामोरे जाण्याचे बळ देतो फक्त स्वतःच्या मनाची हाक ऐका. अपयश आयुष्यात नसेल तर सुखाची चव लागत नाही. सोनंही क्षमतेपेक्षा जास्त तापावल्या जातं तेव्हा कुठे आपण त्याचे रूपांतर दागिन्या मध्ये बघतो. मग आपलं आयुष्य असच कसं बरं चमकेल. तापू द्या तुमच्या मेहनतीला, कष्ट एक दिवशी नक्कीच तुमची ओळख समाजात निर्माण करतील. आधी अपयश नंतरच यश हा निसर्गाचा नियम आहे.
EmoticonEmoticon