" ब्रेकअप "
कशी सांगू माझ्या मनाची ही व्यथा,तिच्या अन माझ्या तुटलेल्या प्रेमाची ही कथा.
जीव जुळतो जिच्याशी आयुष्य जगण्यासाठी,
किती होते व्याकुड मन तिच्या एका हाके साठी.
मी होतो ढिगार मातीचा ती होती माझा कुंभार,
पाणी पडले होते कमी अन चुकला होता थोडा आकार.
का होत होते हे होता येत फक्त विचार,
नात्यांच्या गणिताला आमच्या जसा लागला होता भागाकार.
चूक तिची ना माझी होती दोष लागलेल्या सवयीचा होता,
बोलणारे ओठ अन ऐकणार्या कानाच्या वाढलेल्या दुराव्याचा होता.
अंतर कमी होईना सवय दूर जाईना,
दुखवेल कुणी म्हणून भांडनाचा पुढाकार कुणी घेईना.
झाले भांडण झाले समझवने मित्रही सारे बोलून मोकळे झाले,
ठरवलेली मुदत अन स्वतःला बदलण्याचे सारे प्रयत्न ही बेहाल झाले.
नाही शक्य दोघांना मग ब्रेकअप हाच तर सोपा उपाय आहे,
निदान लग्न करून घटस्पोट घेण्यापेक्षा ब्रेकअप हा तर योग्यच पर्याय आहे.
म्हणून खचून न जाता आयुष्यात पुढे वाढा,
मनाने परवानगी दिली तर दुसरी कडे शिफारस लावा.
प्रेम होऊ शकतं पुन्हा, जन्म पुन्हा मिळत नाही,
नसेल नशिबी तिच व्यक्ती तर वाट पाहण्यातही काहीच अर्थ नाही.
- ©केतन रमेश झनके
कुणावर जीवापाड प्रेम केलं असेल तर नक्कीच जीवन अस्थ्यवस्त होतं ब्रेकअप झाल्यावर. रोजची ती सवय, तो लाभणारा सहवास कुठेतरी नसल्यामुळे आयुष्य अस्थिर होणे अगदी सहाजिक आहे. पण या पेक्षा अजून योग्य काय असेल की ज्या व्यक्ती सोबत तुम्ही सात जन्माची स्वप्ने रंगवून बसतात तो व्यक्ती नेमका त्या स्वप्नांसाठी बनलेला नसेल तर ?? घडलेल्या साऱ्या प्रकारात आपण नशिबाला, एकमेकांना, घरच्यांना, देवाला दोष देतो आणि आपल्या मनाप्रमाणे त्याचे कारणे शोधतो. पण टाळी एका हाताने वाजत नाही ते खरंच, आपण कुठेतरी कमी पडलो situation सांभाळण्यात हे आपण लक्षातच नाही घेत. जेव्हा चूकच आपली आहे मग खचून जाण्यात काय अर्थ ?? या उलट विचार केला तर एक अनुभव आला, आपण कुठे कमी होतो किंवा काय केले असते तर ब्रेकअप नसते झाले याची जाणीव झाली. म्हणून म्हणतात ना प्रेमात पडू नका, तर खंबीर उभे रहा.
Alone_but_happy |
2 comments
Heart touching words... Very creative lines about true love story.. I love it..
Thank you so much 😉🙏
EmoticonEmoticon