Showing posts with label Stories. Show all posts
Showing posts with label Stories. Show all posts

माऊली

माऊली, गजानन महाराज, mauli, mother, marathi poem about love

                       माऊली 


स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,
स्वतः सोसुनी दुःखं सारे संकटांना तीच तारी.
आईच्या प्रेमाला जगात कुठेच स्वार्थ नाही,
कितीही फेडा ऋण तिचे तिच्या उपकारांना अंत नाही.


फाटक्या पदराचे थिगड तिचे अन श्रमाचे सुरकुत्या बोली,
दारिद्र्य दूर करणार बाळ माझं अपेक्षा तिची वाचा खोली.
तुझ्या शिक्षणासाठी ती पसरवायची आज जगण्यासाठी पसरवत आहे झोळी,
तुझ्या ब्रँडेड बुटा खाली चिरडलेली तिची अपेक्षा कधीच होती रे मेली.


तू राहतो महालात ती रस्त्यावर लोळत आहे लाज वाटू दे रे थोडी,
तुला देण्या आयुष्य सुखाचे तिच्या अस्तित्वाचीच केली तिने होळी.
कसे मिळणार सुख तुला तुझे मुले ही कधी मोठी होणार,
जीवनाचे महत्व तुला तेव्हाच कळणार जेव्हा ते ही तुला असेच लाथाडणार.


नव्हती मागत ती वैभव जगाचे तुझ्या हृदयात थोडासा निवारा मागत होती,
तुला लहानाचे मोठे केलेल्या हातासाठी फक्त थोडासा सहारा मागत होती.


हरवलेल्या पोटच्या गोळ्याची ती फक्त वाट बघत होती,
तुला मिळावे सुख सारे देवाला इतकेच ती मागत होती.
किती म्हणावं निस्वार्थ त्या प्रेमाला किती दुःख ती शोषत होती,
अखेरच्या स्वासापर्यंत तरीपण ती नाव तुझेच जपत होती.

माऊली, गजानन माऊली, mauli, mother's love, marathi poem about love
माऊली

                                          -© केतन रमेश झनके

म्हणतात ना तुम्हाला तुमच्या आई पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने कुणीच नाही ओळखू शकत, का ??... कारण ९ महिन्यांचा सहवास जास्त असतो ना तिचा तुमच्या सोबत इतरांच्या तुलनेत. ती नाळ अगदी जन्माच्या आधी पासून जोळलेली असते आणि जेव्हा जन्म घेतो तेव्हा ती तुटते पण तिच्या हृदयात मात्र ती तशीच असते कायमस्वरूपी.
     स्त्रीची सहनशक्ती आणि साहस यास कोणताच पुरुष साम्य नाही करू शकत. तुमच्या शरीरातलं कुठलंही लहान हाड तुटलं तर किती त्रास होईल ?? आपलं एक हाड तुटलं तर सहन न होणारी वेदना आपण अनुभवतो, पण विचार केलाय का प्रसूती दरम्यान स्त्रीला होणारी वेदना ती कशी सहन करत असेल. २० हाडं एक सोबत जेव्हा तुटतात तो होणार त्रास असतो प्रसूती दरम्यान एका स्त्रीला. अशी शक्ती आणि असे साहस सामान्य माणूस नाहीच करू शकत, म्हणून तर म्हणतात ना स्त्री ही देवीचं रूप, मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली, मुलगी शिकली म्हणजेच पूर्ण घर शिकलं. ती घर सांभाळते, नवऱ्याला सांभाळते, परिवाराला सांभाळते तिचे लेकरं सांभाळते मानसिक आणि शारीरिक त्रास किती होत असेल तिला ?? आणि एवढे सगळं करून देखील स्वतःसाठी अपेक्षा काय तिची.. काहीच नाही.
Mauli,maaymauli,maata,mother,mother's love,povert,birthgiver,womb,pain
मायमाऊली

   नर्मदाबाई केशवराव पाटील... मी तिला आजी म्हणायचो. मी पाचवीत असतांना बाबांची ट्रान्सफर झाली होती मलकापूरला, घरा शेजारी आमच्या तिचं कुटुंब राहायचं. नवरा फॅक्टरीत कामाला जायचा, ४ मुलं होती तिला शिक्षणात सर्वेच हुशार. मोठा मुलगा अरुण इंजिनीरिंगला होता, त्याच्या शिक्षणासाठी खूप कर्ज घेतलेले असल्या मुळे नर्मदाआजी पण शेतमजुरी करायची . सकाळी उठून सर्वांचा स्वयंपाक, कपळे, भांडे बाकी घर कामे करून ती कामाला जात असे आणि घरी आल्यावर संध्याकाळी पुन्हा घर कामे आणि स्वयंपाक. तिला कधी इतर बायकांन सारखं सणासुदीच्या दिवशी नटूनथटून जाताना नाही पाहिले मी कधीच, ना तर ती कधी घरी बसत असे. शेतात काम नसले तर ती दुसरे कुठले ही काम करत असे पण सुट्टी हा दिवस तिच्या आयुष्यात कधीच नसे. ती म्हणे आम्ही गरिबीत वाढलो शिकू नाही शकलो, मुलांना शिकवते त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नाही हाऊ देणार. एक वेळा ते त्यांच्या पायावर उभे राहिले की मग करते आराम. मला सारखं वाटायचं जेव्हा सगळे मुलं मोठे होतील कामाला लागतील तेव्हा आनंद चेहऱ्यावरचा बघण्या सारखा असेल या माऊलीचा.

माउली,mauli,mother,maa,godess,mother-child,maaymauli,mother earth
Mother-माऊली

     3 वर्षे शेजारी होतो आम्ही नंतर पुन्हा वडिलांच्या ट्रान्सफर मुळे आम्ही नाशिक ला आलो. एक वरश्यानी नवरा अपघातात वारला  तिचा आणि सारी घराची जवाबदारी आता नर्मदाआजी वर आली. मोठा मुलगा इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता, दुसरा मुलगा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला, तिसरा बारावीला आणि लहान मॅट्रिक ला. सर्वांचे महत्वाचे वर्ष आणि भलेमोठे कर्ज. मिळेल ते काम करून स्वतःचे शिक्षण मुलांनी पूर्ण केले. २० वर्षे ओलांडली त्या सगळ्या गोष्टी आणि नर्मदाआजी माझ्या बालपनाची आठवण बनून राहिल्या. खूप वरश्या नंतर मलकापूरला जाण्याचा योग आला, शाळेत सोबत असलेल्या एका मित्राचं लग्न होता. आता नर्मदाआजी ला जाऊन भेटतो आणि ओळखते का बघतो असे आईला सांगून मी तिच्या घरी गेलो. मातीच्या त्या घराचं आता खूप मोठया आणि भव्य बंगल्यात रूपांतर झालेलं पाहून खूप छान वाटलं, कधी मी घरात जाऊन भेटतो आजीला अशी मनात तगमग होऊ लागली. आत जाऊन बघतो तर तिथे एक दुसरे कुटुंब होते. विचारपूस केल्या वर माहीत झाले की ती जागा ५ वरश्या आधीच विकली. नर्मदाआजी च्या चार मुलांपैकी दोघे परदेशात असतात, एक मुंबई ला आणि लहान मुलगा स्वतःचा व्यवसाय करतो बंगलोर मध्ये.
      मी विचारले, " आणि आजी कोणत्या मुलाजवळ असते". माझी उत्सुकता गगनाला होती, मी मनातच विचार करत होतो. " अरुण काका जवळ असेल, नाही  धाकट्या जवळ असेल ". पण उत्तर ऐकून  माझे कान स्तब्ध झाले, ते गृहस्थ म्हणाले अनाथ आश्रमात. मी पुन्हा विचारले प्रत्येकाची मला आठवत असलेली ओळख देऊन परत परत शहानिशा केली पण उत्तर तेच आले. मी काही विलंब न करता लगेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले अनाथाश्रम गाठले. तिथे चौकशी केली कुणी सांगेना, मी म्हटले मी तिला न्यायला आलोय मला तिच्याशी बोलू द्या. माझी तिला भेटण्याची तगमग आणि अपुलकी बघून ५-६ म्हाताऱ्या तिथे आल्या आणि मला म्हणाल्या, " ती २ वरश्या आधीच मरण पावली ". ४ मुलं असतांना देखील कुणी तिचा सांभाळ करत नव्हते. रस्त्यावर पळलेली होती भुखेने शरीराचे फक्त हाडं राहिले होते, कर्मचाऱ्यांनी तिला अनाथाश्रमात आणले. ती शेवटच्या स्वासा पर्यंत वाट बघत राहिली पण अनेक फोन करून, पत्रे लिहून सुद्धा तिला भेटायला कोणताच मुलगा नाही आला. माझे अश्रू थांबता थांबेना, मला वाटलेली कल्पनिकता आणि असलेली वास्तविकता यांचा कुठेच मेळ नव्हता.

माऊली,mother,duckndove,mother love,motherland,aai,maay,maata,maaymauli,maaymarathi
Duck with dove

      मुलांचे लग्न झाले जो तो आपली आपली वाट घेऊन निघून गेला. धाकटा मुलगा राहते घर विकून व्यवसाय करण्यासाठी बंगलोर ला गेला आणि परत कधी आलाच नाही. कामात व्यस्त आहे नाही येऊ शकत सांगत त्याने आपला पाय काढून घेतला. दोघे परदेशी स्थायी झाले आणि ते सुद्धा परत आले नाही. अरुण एकमेव आधारस्तंभ होता त्यानेही बायको आणि आईच्या होणाऱ्या वादामध्ये आईलाच दोषी ठरवत, " मी तुला रूम करून देतो तू तिकडे राहा मी अधून मधून येत जाईल " असे सांगून वाऱ्यावर सोळले. ज्यांच्यासाठी जीवाचे रान केले त्यांनीच त्या रानाला पेटविले.

    तिला होणाऱ्या त्रासाचा आणि तिच्या त्यागाच्या मोबदल्यात मिळालेल्या दुःखाचा विचार ही केल्या जाऊ शकत नाही. बस एवढेच सांगू शकतो, केलेले पाप इथेच फेडावे लागतात. कुणाला दुखावून आपण पुढे तर जाऊ शकतो पण सुखी नाही राहू शकत. आपल्या पाऊलखुणा एक दिवस आपल्याच बरबादीच कारण बनतात.


पहिले प्रेम

First love,School time romance,पहिले प्रेम,True love,Lifeline

                  पहिले प्रेम 

शब्द गेले तुझे मला काही सांगुनी,
माझ्या मनाचा आरसा मलाच मग दाऊनी.
भास होता तो की तुझ्या प्रेमाचा गारवा होता,
तारुण्यात वाहून नेणारा तो अवकाळी पाऊस होता ।।

वेळे आधी क्लास मध्ये एकटाच मी बसून राहायचो,
तुझी एक झलक मिळताच मनामध्ये आनंदी पिसारा मी फुलवायचो.
असली तू की वेळ माझा क्षणात संपून जायचा,
नसली तू की 1-1मिन्ट माझा तासा प्रमाणे जायचा ।।

तुला बघण्यासाठी ट्युशन समोर तुझ्या लपूनछपून मी यायचो,
तुझ्या लेडीस सायकल वर क्षणभर बसून तुझा आभास मी अनुभवायचो.
तुझ्या सायकल शेजारी ही सायकल कुणाची मला मंजूर नव्हती,
   कारण विठोबा संगे रुख्मिनी हीच जोडी तर माझ्या डोळ्यात होती ।।

संपली शाळा आलं कॉलेज पण तुझी साथ नाही राहिली,
तुझा तो आभास अन तुझी ती झलक शब्दातच कुठे हरविली.
संपला खेळ बाहुल्यांचा शहाणपणाचा डोंगर देखील आता आला,
शहाणी झाली माझी बाहुली पण हा बाहुला तर बहुलाच राहिला ।।
                                  
First love,True love,Lifeline,Together forever,पाहिले प्रेम,प्रेमाची गोष्ट,शाळा,वेळ लागले प्रेमाचे,सैराट
First love


प्रेम.... म्हणावं तितकं लहान, करावं तितक मोठं आणि अनुभवाव तितकच निरंतर.
       

शाळेत, कॉलेजात, ट्युशन मध्ये किंवा या व्यतिरिक्त बाहेर कुठेतरी सर्वांना एक व्यक्ती नक्कीचं आवडलेली असते. कुणाला न सांगता आपण ज्यात रमू लागतो, त्या व्यक्तीचे सोबत असणे किंवा दिसणे देखील आपल्याला बेचैन करते असच ते प्रेम.
    माझं पण होतं असं कुणावरतरी जिचा विचार जरी आला तरी आयुष्य सारं स्तब्ध व्हायचं माझं. आता ती त्या वयात झालेली एक मस्ती किंवा आकर्षण म्हणता येईल पण तेव्हा ते खरं प्रेम वाटायचं अगदी फ्रेंडरी मधल्या जब्या सारखं. आपण ट्युशन लावलेली नसतांना तिच्या ट्युशन जवळ यायचं मित्रांना सांगायचं की अरे तुम्हाला भेटायलाच आलो होतो आणि उगाच आपले डोळे रिचार्ज करायचे तिला बघून हे तर प्रत्येकानेच अनुभवले असेल. ती शाळेसाठी घरून केव्हा निघते, कुणासोबत येते, तिला क्लास मध्ये यायला किती टाईम लागतो या साऱ्या गोष्टी अगदी जेम्स बॉण्ड सारख्या आपल्याला ठाऊक असायच्या कारण दिनचर्या तिथूनच तर सुरू व्हायची ना. बाबांनी एखादं खेळणं आणल्यावर जसं लहान असताना आपण भाऊ/बहिन कुणालाच खेळू देत नाही त्या सोबत कारण ते आपल्या आवडीचं असतं. तसंच तिच्या शेजारी जागा आपलीच असावी मग ती सायकल असो की वर्गात तिला बघता यावे अशी जागा असो, ती आपलीच असावी असेच वाटायचे कारण ती सुद्धा आपल्या आवडीचीच ना. चुकून माझ्या कडे बघून जरी हसली तरी रिस्पॉन्स मिळतोय हे समाझण्याची तेव्हा अक्कल नव्हती.
            शाळा संपली कॉलेज मध्ये गेलो म्हणजेच माझा तारुण्यात प्रवेश झाला. चेहऱ्यावर दाढिमिशी फुटू लागली, गळ्याला कंठ दिसू लागला आणि विचारांना असंख्य अशी पालवी येऊ लागली. ती पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आणि माझी दिनचर्या पूर्णपणे ढासडली. आता ट्युशन समोर येणे तिला बघणे, वर्गात आधी जाऊन तिच्या येण्याची वाट बघणे ह्या साऱ्या गोष्टी नाही होणार याचा विचार करूनच माझी गोची झाली. प्रेम झालेले नसतांना देखील त्या अकर्षणाच्या दुराव्या मुळे त्रास होऊ लागला. स्वतःला समझवणे खरंच खूप कठीण, आणि स्वतःला समझ नसताना देखील प्रयत्न करणे त्याहूनही कठीण. हळू हळू कळत गेले की तरुण्याचा उंबरठा ओलांडताना सर्वांनाच होतं असं. आता वाटते की किती निरागस होतं ते सर्व काही त्यात अपेक्षा नव्हती की तिने सुद्धा माझ्या बद्दल तसाच विचार करावा. एकतर्फी असतांना देखील त्याला नाव एकतर्फी नव्हते कारण हे सारकाही समझण्याची तेव्हा कुठे एवढी अक्कल. आज जेव्हा तिला मी ह्या गोष्टी सांगतो तिच्या तोंडून फक्त एवढंच निघतं " बावरटच आहेस तू आधी पासून "

One sided love,True love,First love,pyar me dhoka
पहिले प्रेम

            तो पोरकटपणा इतका छान वाटायचा की बालपण कधी जाऊच नये, आयुष्य हे दहावी/बारावी पर्यंतच पुन्हा पुन्हा यावे असे आता वाटते. कारण नंतर चे आयुष्य हे दगदगीचे, स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचे, घरखर्चात आपले योगदान देण्याचे आणि पैसा-वैभव मिळविण्यातच जाते. म्हणून तर म्हणतात ना.
          " लहानपण दे गा देवा
             मुंगी साखरेचा रवा "

                                  - © केतन रमेश झनके

Dear Comrade

            वंदन तुम्हा कराया शब्द हे पुरे नाही, कार्य हे तव जणांचे सोपी ही बात नाही. अवघड परिस्तिथीत ही कर्तव्य बाळगे जो, तुमच्यात ...