" मैत्री तुझी आणि माझी "
मैत्रीला तुझ्या माझ्या हळू हळू बहरतांना मी पाहंलय,
वाळवंतात ही फुलाला उमलतांना मी पाहंलय,
माझ्या हृदयाच्या ठोक्यांना तुझासाठी गातांना मी पाहंलय,
माझ्या डोळ्यांना तुझ्या आठवणीत आज बोलतांना मी पाहंलय.
असतेस तू बोवती तेव्हा मला का जग विसरावेसे वाटते,
तुझे हसणे आणि ते क्षणात रुसण्यात का रमून राहावेसे वाटते,
आहेस तू माझ्यासाठी कोण का ओरडून सांगावेसे वाटते,
दूर जाते वेळी का तुला पुन्हा भेटावेसे वाटते.
असली तू सोबत की मला दुसरं काहीच दिसत नाही,
पावसाच्या झरीतही जसं अळूच पान भिजत नाही,
तुला भेटल्या शिवाय मला पुढले शब्द सुचत नाही,
पाण्या शिवाय मासा जसा जगू जगत नाही.
मी फुटाना प्रसादाचा तू साखरेची गोड खळी,
वाटे मला होतीस कुठल्या जन्मी तू माझी जुळी,
मैत्रीच्या तारेने जुळली कसली ही साखंळी,
अमावसेच्या रात्रीतही जशी झगमगली रांगोळी.
आयुष्याच्या वडणावर पुन्हा पुन्हा मी झुरतो,
तुझ्या साथीच्या प्रकाशाने नव्या जोमाने मी उजाळतो,
आठवण तुझी करून शांत रात्रीस मी निजतो,
देवी आहेस तू माझी म्हणून तुलाच मी पूजतो.
- ©केतन रमेश झनके
मैत्री म्हणजे जगण्याचे साधन, सुखाचें अंगण, दुःखात धिर देणारा सुखद खांदा आणि ताणूनही न तुटणारा प्रेमाचा अतूट धागा. मैत्री ही कुणाशीही असू शकते त्याला वयाची मर्यादा नाही, त्याला स्त्री-पुरुषच असण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक ती व्यक्ती जी तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं ओळखते, तुमची काळजी करते, तुमच्या सुखा-दुःखात सदैव साथ देते त्या व्यक्तीशी तुमची मैत्री होणे सहाजिकच. मैत्रीच्या नात्यामध्ये Physics चा फंडा खूप छान शोभतो. Physics म्हणते " Opposite charges attract each other ". अगदी खरं आहे मुलाचं आणि आईचं, बाबांचं आणि मुलीचं, भाऊ आणि बहिणीचं किंवा एक मुलगा आणि मुलगी यांच्या मैत्रीचं नातं काही वेगळंच.
पाळीवप्राणी हे मनुष्याचे सर्वात चांगले आणि अखेरच्या स्वासा पर्यंत मैत्री निभावणारे एक जगजाहीर नाते आहे. निस्वार्थ प्रेम हे प्राण्यांनकडून शिकावे असे म्हणतात. तुम्ही हचिको नावाच्या कुत्र्याची गोष्ट ऐकली असेलच तशी मैत्री आणि तसा जिव्हाळा मनुष्यामध्ये सापळणे कठीणच. जपान मध्ये राहणाऱ्या एका शिक्षक उनो आणि त्याचा कुत्रा हचिको याची ही गोष्ट. उनो आणि हचिको आनंदात एका घरात राहायचे. रोज ड्युटी वरून जेव्हा उनो घरी यायला निघायचा स्टेशन बाहेर हचिको त्याची वाट बघत असे. दोघांचे आयुष्य हे एकमेकांशिवाय अपूर्ण होते. एके दिवशी नेहमी प्रमाणे उनो आणि हचिको स्टेशनला आले. त्या दिवशी केलेला गुडबाय हा शेवटचा असेल हे हचिकोला देखील कुठे ठाऊक. नेहमी प्रमाणे सायंकाळी ड्युटी संपवून उनो येत असेल या अपेक्षेने हचिको स्टेशन बाहेर त्याची वाट बघू लागला. उनो चा मृत्यू झाला होता, त्याला ब्रेन स्ट्रोक आला आणि तो ड्युटीवर असतांनाच मरण पावला. त्या दिवशी हचिको स्टेशन बाहेर त्याची वाट बघत होता. हिवाळ्याच्या दिवसात बर्फवरश्याव सुरू होता आणि हचिको तरीही तिथेच वाट बघत बसलेला होता. उनोचा मुलगा हाचिकोला शोधत आला आणि त्याला घरी घेऊन गेला. रोज हचिको नित्यनियमाने सकाळी स्टेशन बाहेर बसायचा आणि सायंकाळी नेहमीच्या वेळे पर्यंत वाट बघायचा. इतरांप्रमाणे हाचिकोला हे कळणे खूपच कठीण होते की त्याचा जिवलग मित्र उनो आता जिवंत नाही. हचिकोची जबाबदारी आता उनोच्या मुलावर होती. उनोचा मुलगा हचिकोला घेऊन दुसरी कडे राहू लागला. हचिको तिथून पळून आला आणि नेहमीच्या ठिकाणी उनोची वाट बघू लागला. त्याला रोज ही अपेक्षा असायची की एक दिवस नक्कीच त्याला उनो दिसेल आणि दोघे सोबत घरी येतील. हचिको आणि उनोला ओळखणारा एक हॉटेल मालक रोज हचिकोला खायला देत असे. हचिकोची तळमळ आणि त्याचं प्रेम बघून हॉटेल मालक सुद्धा भारावून गेला. सलग ९ वर्षे हचिको उनो ची वाट बघत राहिला. रोज नित्यनोयमाणे प्रामाणिकपणे हचिको आपली मैत्री निभावत राहिला. शेवटी प्राण सोडले हचिकोने पण एक दिवस उनो येईल हा विश्वास कमी होऊ दिला नाही. मैत्रीचा असा प्रामाणिकपणा आणि असं प्रेम खरंच मनुष्यामध्ये नाही सापडू शकत. उनोच्या कबरी जवळ हचिकोची कबर बनवण्यात आली. जपान मध्ये शिबुया नावाच्या ज्या स्टेशन वर हचिको उनोची वाट बघायचा त्या स्टेशन जवळ हचिको चा पुतळा उभारण्यात आला.