Dear Comrade

           
go-corona-go,fight-against-corona,covid19,chinese-virus,pandemic,corona-outbreak,saviours,god,stay-at-home,stay-safe,quarantine,quarantine-life,corona-epicenter,police,doctor,emergency-services

वंदन तुम्हा कराया शब्द हे पुरे नाही,
कार्य हे तव जणांचे सोपी ही बात नाही.
अवघड परिस्तिथीत ही कर्तव्य बाळगे जो,
तुमच्यात देव दिसतो तो देवळात नाही.


माणूस तो दूर झाला स्पर्श गुन्हेगार झाला,
तांडव करण्या पृथ्वीवर्ती कोरोनाचा उगम झाला.
हतबल मनुष्य आमुचा घरात कैद झाला,
लढण्या युद्ध कोरोनाशी सारा महाराष्ट्र उभा झाला.


बलिदान तो सुखाचा परिवार लेकरांचा, करतोय रातदिन म्हणून आपणा दिसे दिवस उद्याचा.
पोलीस असो वा डॉक्टर अन सफाई कर्मचारी,
सहकार्य त्यांना करणे आपली ही जिम्मेदारी.


कर्तव्य आपले चला आपण ही बाळगू या,
थोडीसी मदत धनाची CMला पाठवू या.
घरात राहुनी आपण सहकार्य हे करूया,
कोरोनाचा नायनाट सोबत मिळून आपणच करूया.


शुर वीरांची गड्या आपली आहे ही मातृभुमी,
Quarantine कर स्व:ताला शिवाजी राजेवानी,
कोरोना रूपी अफजल खानला चल हरवू  मावळ्या रे,
घेऊन सोबतीला जीवा महाले आपल्या comrade च्या रूपानी.
                                          - ©केतन रमेश झनके

Friendzone

           
friendzone,friends,love,one-side-romeo,hurt,lost,one-side-love,propose,ditched,dump,rejected,brozone,nolove,lovemenot,only-friends,just-friends

जीवनात अचानक कुणी मिळतं जातं डोळ्यांना मोहून पण हृदयाला कुठे ते कळतं.

वाटलं नव्हतं माझ्यासंगे ही असे कधी होणार,
हृदयाची तार माझ्या अलगत कुणी अशी छेडणार.
डोळ्यांना माझ्या लावून आस तुझ्या स्वप्नांची,
मला ही कुणी रात्र रात्र जागवणार.

क्लास मध्ये झालेली ती पहिली भेट आजही मला आठवते,
चाहूल न करता येते मनात अन जागीच प्रेम दाटवते.
लपून तू मला कधी मी तुला बघायचो,
न कळत मना मध्ये आनंदी पिसारा फुलवायचो.

नव्हता विचार कसला पण जुळत गेले धागे,
यालाच तर म्हणतात ना प्रेम कधी मी तुझ्या कधी तू माझ्या मागे.
करते तू ही प्रेम माझ्यावर मग उगाच हा मैत्रीचा बहाणा का,
मैत्रीचा तर पिवळा असतो ना रंग मग गुलाब निवडते तू लालचं का.

तू दिलेल्या गुलाबात मला तुझाचं चेहरा दिसतो,
तू लिहलेल्या कवितांच्या ओळीन मध्ये मी दिवस रात्र भिजतो.
माझी काळजी आणि माझ्यासाठी केलेल्या ह्या गोष्टी प्रेम नाही तर काय आहे,
एक वेळा माझ्या डोळ्यात बघून सांग Special Friendship ला आपल्या काय फक्त मैत्री हेच नाव आहे.

                               - ©केतन रमेश झनके

      " तू मला खूप आवडतोस रे..... पण मित्रं म्हणून " एक वाक्य आणि खेळ खल्लास. कॉलेज लाईफ मध्ये एकतर्फी प्रेमात आलेला हा बहुतांश मुलांमधला दुःखद अनुभव. मुळात मुलींना समझने खरंच कठीण असतं हे मुलांना या वाक्या नंतरच कळू लागतं. कारण आधी प्रत्येक मजनू हा " कुछ कुछ होता है " चा राहुल आहे असेच स्वतःला समझतो, नंतर तो " तेरेनाम " चा राधे आहे हे त्याला कळतं. काही मुलांच्या बाबतीत हा राहुल " प्यार का पंचनामाचा " लिक्विड सुद्धा असतो. मुलींच्या तुलनेत मुलांचं मन खूप हळवं असतं असे काही विचारवंत म्हणतात, पण खरं बघायचं झालं तर मुलांचं हळवं मन फक्त मुलगी प्रेमातपडे पर्यंतच असतं. नंतर मुलगा कबिरसिंग आणि मुलगी बिचारी प्रीती, आणि सुरू होते बेखयालीचा कार्यक्रम.
              मुली त्या व्यक्तीशी जास्त प्रेमाने किंवा जास्त मानमोकळेपणाने बोलतात ज्यांच्याशी त्या बोलण्यात comfortable असतात. कारणही तितकेच सोपे आणि सरळ आहे लाभलेला सहवास, एकमेकांबद्दल आपुलकी आणि त्यांना बोलून मोकळं वाटेल असा स्वभाव असेल तर त्या comfortable feel करतात. पण मुलांचं मन थोडं वेगवान असतं, त्यांना आवडणाऱ्या मुलीबद्दल त्यांची theory काही वेगळीच. पहिल्या दोन भेटीत बोलल्यावर तिसऱ्या भेटीत साधा हातांचा स्पर्षजरी झाला विकेट पडली समझायची. आणि इथूनच सुरू होतो मुलांच्या मनावर त्या मुलीचा परिणाम. मग तिचं नेहमीसारखं मनमोकडं बोलणं प्रत्येक वेळी नवीन कौतुक वाटू लागतं. तिला दहा वेळा पाहिलेल्या त्याच पोषाखमध्ये ती अकराव्या वेळा काही वेगळीच वाटू लागते. तिची सुंदरता आणि रूप एखाद्या हिंदी सिनेमातल्या नटीला मागे टाकेल अशी वाटू लागते. असा हा मुलगा वाहत वाहत प्रेमाचा प्रवास करू लागतो, आणि मुलीच्या नकारात्मक विधानाने जणू ह्याची नावच बुडायला येते.
      अश्या मुलींच्या या कृतीला इंग्रजी मध्ये Friendzone असे म्हणतात. म्हणजेच अशी भिंत ज्यात तुम्ही पुढे प्रेमाच्या दिशेने जाऊ शकत नाही कारण असे करण्यास मुलीची तुम्हाला परवानगी नसते. आणि मागे येऊ शकत नाही कारण आता सवय झाली आहे बोलण्याची, बोलण्यात रमण्याची आणि तिला बोलतांना नेहमी हसवत राहण्याची. 

Dear Comrade

            वंदन तुम्हा कराया शब्द हे पुरे नाही, कार्य हे तव जणांचे सोपी ही बात नाही. अवघड परिस्तिथीत ही कर्तव्य बाळगे जो, तुमच्यात ...