पितृ देवो भवः

       
fathers day,happy father's day,father-daughter,fatherly love,dad,papa,appa,baba,love,family
 

             " पितृ देवो भवः "


कधी पाझर मायेचा कधी रागाची ती थाप,
वाकलेल्या खांद्यावर दिसे आयुष्याची वाट.
झिजतो आयुष्यभर पण कधी सांगत तो नाही,
बाप प्रेमाला आपल्या कधी दाखवत नाही.

फाटलेल्या सदऱ्याला कधी लाजत तो नाही,
पाय झिजले चालुनी पण थांबत तो नाही.
घाम गाळतो अपार घर संसार चालवाया,
लावे आयुष्य स्वतःचे लेकराला घडवाया.

पहिले पाऊल चालतांना बोट बापाचे असते,
शिक्षणाच्या खर्चामागे श्रम बापाचे असते.
उभा राहिला पायावर तर थाप बापाची असते.
जेव्हा लढतो नशिबाशी तेव्हा साथ बापाची असते.

कधी मित्रासारखा जिवलग कधी आईचे काळीज,
जीवनात तो निभावतो पात्रे आयुष्यातील सारीच.
बोलके नाही ते प्रेम म्हणून जाणवत कुणा नाही,
बाप स्वतः झाल्याशिवाय बाप समझत कुणा नाही.

                                      - © केतन रमेश झनके


happy-fathers-day,head of the family,papa,dad,father-daughter,baba,appa,family,love,father-son-love

               जगात देव शोधावा कुठे, श्रद्धा असेल तर तो दगडात पण दिसतो आणि विश्वास असेल तर तो माणसात सुद्धा. आपले पहिले देव आणि श्रद्धास्थान म्हणजेच आपले माता-पिता ज्यांनी हां जन्म दिला. आईचे वर्णन जितके मवाळ आणि प्रेम करणारे केल्या जाते, तितकेच वडिलांचे कणखर आणि शिस्तप्रिय जसे काही आपल्या स्टोरी मधले ते जणू व्हीलनच असावेत. पण आपल्या संगोपनात जेवढा वाटा आईचा असतो तेवढाच बाबांचा सुद्धा, फरक फक्त एवढाच की बाबांची प्रेम दाखवण्याची पद्धत ही बोलकी नसते किंवा त्यात जाहीर कृती नसते. ती वेळोवेळी नकळत परस्पर अनुभवणारी असते. तिला शब्दांची किंवा भाव मांडण्याची ओढ नसते, जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने ते ठाऊक असेल.
           मला आठवणारी माझ्या वडिलांची सर्वात पहिली आठवण म्हणजे माझं बोट पकडून मला शाळेत घेऊन जाणे, मी अगदी दूरवर दिसेनासा होईल तो पर्यंत शाळेबाहेर थांबणे आणि मगच तेथून जाणे. तसंतर शाळेत सोडणे, घ्यायला येणे हे डिपार्टमेंट आईचं पण बाबा सोडायला येतील तरचं मी शाळेत जाणार असा हट्ट करणारा मुलगा असेल तर काय करणार बिचारे पालक सुद्धा. केस कापायला घेऊन जातांना आधी आवडीचे पदार्थ खाऊ घालायचे आणि मग हसे तसे म्हणजेच बारीक केस कापून घ्यायचे, हा त्यांचा मास्टर प्लॅन. सलमान खान आणि संजय दत्त ला बघून केस वाढवण्याचा हट्ट हा फक्त राजमालाईचे चॉकलेट मिळे पर्यंतच कारण लहान जीव आणि कोवळं मनःचॉकलेट समोर कुठे कुणाला जुमानतं. दिवाळीच्या दिवशी माझी चप्पल/बूट नवा, कपडे नवे पण बाबांची तुटलेली चप्पल आणि जुन्या कपड्यांचा कधी विचारच नाही आला. माझे हट्ट माझे गरजा आणि माझी लाईफ सेट करण्यात बाबांची आर्थिक परिस्थिती टाईट व्हायची पण कधी जाणीव मला होऊच दिली नाही.
Father,daughter,love,family,bond,best-friend,fatherly-love,fathers-day,daddys-little-princes,baba,appa,papa,anna,wadil,pitaji,pitashri,pitru-dev-bhava
Father-daughter

       मी शिक्षणासाठी बाहेरगावी असतांना फोनवर फक्त जेवण झालं का, पाऊस-पाणी/थंडी/ऊन कसं आहे तिकडे एवढं मोजके बोलणारे बाबा नेमकं माझा मूड खराब जाणवला तरंच जास्त वेळ बोलायचे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी येणाऱ्या प्रसंगांना कसे उत्तर दिले, त्यांनी काय केलं हे सारंकाही बोलून नकळत ते मला मार्ग दाखवायचे. आईसारखं काळजीघे रे बाळा असे शब्द त्यांना म्हणता नसले येत तरी साधी सर्दी झाली तरी डॉक्टर कडे जाऊन ये म्हणणारे त्यांचे बोल वारंवार त्यांचं प्रेम दाखवतात.


5 comments

अप्रतिम रे मित्रा..👌👌👌

अप्रतिम मास्तर 👌👌

एकदम कड़क 👌👌👌👌👍👍


EmoticonEmoticon

Dear Comrade

            वंदन तुम्हा कराया शब्द हे पुरे नाही, कार्य हे तव जणांचे सोपी ही बात नाही. अवघड परिस्तिथीत ही कर्तव्य बाळगे जो, तुमच्यात ...