Maharashtrian_couple |
" शुभमंगल सावधान "
ना बोलता ऐकू यावे अशी हाक देशील का,
आठवेल मला पुढल्या जन्मी असा सहवास देशील का.
मेहेंदी ने रंगलेला तुझा तो हात माझ्या हातात देशील का,
पहिल्या पावसाचा तो मृदुल सुगंध या नभास देशील का.
दिला साथ मला नेहमी माझे जीवन फुलले,
कधी झालो मी तुझा माझे मलाच ना कळलें.
फिरणाऱ्या या भवऱ्याला तू जागीच बसवले,
काळ्या दगडाच्या रेषेला ही तू पुसून दाखवले.
दूर करून माझे दुर्गुण माझा स्वीकारं तू केला,
जेव्हा लढलो नाशीबाशी मला आधार तू दिला,
तुझी गरज लागते मला जीवन जगाया,
तूच माझा प्रतिबिंब तूच माझी अबोल छाया.
चंद्र दिसला मला की तोच मधुचंद्र वाटे,
तुझ्या मिठीत शिराया भावनांचा पूर दाटे,
रोज बंद डोळ्यांनी सांग ना तुला कुठवर पाहू,
तुझ्यासंगे राहायला अजून किती वाटं पाहू.
माझ्या मनामध्ये तूच घरा मध्ये तुझी आसं,
माझा संसार थाटाया तू येणार हमखास,
तुझा बिना नको मला तो हळदीचा वासं,
तू oxygen माझे फक्त तुझ्या पाशीच माझा स्वासं .
- ©केतन रमेश झनके
साखरपुडा ते लग्न या मधला प्रवास हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रवास असतो. दोन अनोळखी व्यक्ती जेव्हा एकमेकांना ओळखण्यास सुरुवात करतात हृदयाची ती होणारी तगमग ही काही वेगळीच असते. दिवस-रात्र फक्त त्याच व्यक्ती बद्द्ल तुम्ही सतत विचार करत राहतात. झोप येई पर्यंत एकमेकांशी बोलणे, डोळे उघडताच गुड मॉर्निंगचा मेसेज करणे आणि दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टी एकमेकांना सांगत राहणे यात कसा हा वेळ जातो काहीच कळत नाही. एकमेकांच्या आवडी-निवडी, भूतकाळातल्या घटना, पुढील होणाऱ्या वाटचाली, राग आणि प्रेम हे जाणीव करून देतांना आणि अनुभवताना एक सुखद तरंग आयुष्यात आल्याची जाणीव होते. मनाची उत्कंठता आणि व्याकुळ भावना आपल्याला इतकी गुंतवून ठेवते की स्वतःपेक्षा ही आपण त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतो. या काही महिन्यांच्या काळात केलेले हट्ट, हास्य, रुसवे आणि नसंपणारे बोलणे कधी संपूच नये असे वाटते. लग्नाची शॉपिंग, सोयर्यांच्या भेटी, घराची सजावट, अमंत्रणाची यादी या सर्वांमध्ये हा सुखाचा अनमोल वेळ लगेच निसटतो आणि येतो दिवस लग्नाचा.
दिवस तो एकमेकांच्या आयुष्यात शामिल होण्याचा. थोरांच्या आशीर्वादाने आणि साक्षीने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या. परिवार, सगेसोयरे, मित्र-मैत्रिण आणि अपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांच्या उपस्थितीचा.
1 comments:
खूप छान
अप्रतिम कविता
सुरेख माहिती
EmoticonEmoticon